scorecardresearch

ममतांकडून राज्यपाल धनखड ‘ब्लॉक’

धनखड यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करणारी पत्रे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पाठवली आहेत

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड हे ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर आपल्या सरकारविरुद्ध नियमितपणे करत असलेल्या पोस्टमुळे ‘विचलित’ झाल्याने आपण ट्विटरवर त्यांना ब्लॉक केले आहे, असे राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी सांगितले.

धनखड यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना अनेकदा धमक्या दिल्या असल्याचा आरोपही बॅनर्जी यांनी केला.

धनखड यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करणारी पत्रे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेकदा पाठवली आहेत, मात्र आतापर्यंत त्यांनी यावर काही कार्यवाही केलेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ममता बॅनर्जी यांचे राज्यपालांशी कटू संबंध आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mamata banerjee blocks west bengal cm governor on twitter zws

ताज्या बातम्या