टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची घटना ३० मे रोजी घडली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकत त्यांचा शर्ट फाडण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण केल्याचा आरोप टीएमसी पक्षाकडून करण्यात आला आहे. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालमधील सोनारपूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बॅनर्जी यांना मारहाण झाल्याची ही घटना घडली. या घटनेमुळे पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, त्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांना कोलकाता येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर काही वेळाने ममता बॅनर्जी या अभिषेक बॅनर्जी यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या होत्या. पण यावेळी ममता बॅनर्जी या संबंधित हॉस्पिटलच्या सीईओंवर भडकल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी या संबंधित हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना कठोर शब्दांत सुनावताना दिसत आहेत. “तुम्ही हॉस्पिटल चालवत आहात? तुम्ही खूप अहंकारी आहात”, असं ममता बॅनर्जी हॉस्पिटलच्या सीईओंना बोलल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ही घटना घडल्याचा दावाही भाजपाने केला आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
भाजपाने व्हिडीओ केला शेअर
भाजपाच्या प्रवक्त्यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “शनिवारी रात्री ममता बॅनर्जी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांवर आणि विशेषतः सीईओ प्रदीप टंडन यांच्यावर भडकल्या होत्या. ममता बॅनर्जी यांचा अद्यापही अहंकार कमी होताना दिसत नाही.”
Last night Mamata Banerjee was shouting at the Hospital Authorities of Belle Vue & especially against Mr. Pradip Tandon (CEO), her arrogance isn't going away either. pic.twitter.com/CP8djkGYns
— Sudhanidhi Bandyopadhyay (@SudhanidhiB) May 31, 2026
दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपाच्या मुख्य प्रवक्त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच वैद्यकीय तपासणीत खासदार अभिषेक बॅनर्जी यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं समोर आल्यानंतरही टीएमसी प्रमुखांनी रुग्णालय प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
1/3
— Debjit Sarkar (@Bjp_Debjit) May 30, 2026
Shame on Mamata Banerjee for allegedly threatening Belle Vue Hospital CEO Pradeep Tandon and pressuring hospital authorities to admit Abhishek Banerjee despite medical reports indicating no significant injuries. pic.twitter.com/1DEe3aAXYZ
भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, “ममता बॅनर्जी यांना लाज वाटायला हवी, वैद्यकीय अहवालात कोणतीही गंभीर दुखापत दिसून येत नसताना देखील त्यांनी कथितपणे हॉस्पिटलच्या सीईओंना धमकावलं आणि अभिषेक बॅनर्जी यांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनावर दबाव आणला. राजकीय फायद्यासाठी वैद्यकीय संस्थांचा गैरवापर करण्याचा हा एक चिंताजनक प्रयत्न आहे. रुग्णालय हे वैद्यकीय गरजेनुसार रुग्णांना सेवा देण्यासाठी असतात, राजकीय सोयीसाठी नाही”, असं म्हणत भाजपाने ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे.
अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणात पाच जणांना अटक
टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित झाल्याच्या घटनेनंतर विरोधकांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. या घटनेनंतर भाजपा आणि टीमसीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने राजकारण तापलं आहे. दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित झाल्याच्या घटनेत आता पोलिसांनी मोठी कारवाई करत या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक केली असल्याची माहिती सांगितली जात आहे.
