भवानीपूरमध्ये ‘खेला होबे’ ; पोटनिवडणुकीत विजयी होत ममता बॅनर्जींनी कायम राखलं मुख्यमंत्रीपद!

भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी केला पराभव

(प्रातिनिधक छाायाचित्र)

पश्चिम बंगालमधील भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर, सर्वांच्या नजरा आज सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेल्या मतमोजणीकडे लागल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. कारण, मे महिन्यात नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला होता. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीने एकहाती सत्ता आणलेली जरी असली, तरी देखील ममता बॅनर्जी या स्वतः निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत कायदेशीरदृष्ट्या निवडून येणं गरजेचं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीला विशेष महत्व होते. भवानीपूर हा ममता बॅनर्जींचा पारिपारीक मतदारसंघ आहे.

ममता बॅनर्जी ५० हजार मतांनी विजयी होतील; निकालाआधीच तृणमूल नेत्यांचा दावा

तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला होता की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत. हा दावा खरा ठरला. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने ममता बॅनर्जी विजयी झाल्या आहेत. ३० सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत भोवानीपूरच्या २,०६,३८९ मतदारांपैकी केवळ ५७.०९ टक्के मतदान झाले. तर २६ एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी निवडणूक लढवली तेव्हा हा आकडा ६१.७९ टक्के होता. चट्टोपाध्याय २८,७१९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mamata banerjee wins bhawanipur by election in west bengal msr

Next Story
भारतात तब्बल २३७ अब्जाधीश; गौतम अदानी कुटुंबाने दिवसाला कमावले १ हजार २ कोटी!
फोटो गॅलरी