तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी आपल्या भाषणांतून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीका करत असतात. नुकतंच त्यांनी आता युक्रेनमध्ये रशियन लष्कराच्या घुसखोरीला मोदी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.


या व्हिडीओसोबत अधिकारी यांनी ट्वीटही केलं आहे. या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जी मोदींना विचारतायत की, रशिया युक्रेनमधलं युद्ध सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचार करायला हवा होता की आमची विद्यार्थी युक्रेनमधून परत येतील, तेव्हा कुठे खातील, कुठे जातील, त्यांचा अभ्यास कसा सुरू ठेवतील? तुम्ही केवळ पोकळ आश्वासनं देत आहात.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर


भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी ह्या व्हिडीओसोबत केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहेकी हे अकल्पनीय आहे. त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केलं आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या या विधानाची दखल घेण्यास सांगितलं आहे. त्यांच्यामते, या विधानामुळे भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम होऊ शकतो.

आपल्या ट्वीटमध्ये अधिकारी म्हणतात, हे अकल्पनीय आहे. माननीय ममता बॅनर्जी यांनी काल सगळ्या सीमा ओलांडल्या आणि रशिया युक्रेनच्या युद्धासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरलं. त्यांनी असा विचार केला नाही का की हे शब्द देशाच्या विरोधात वापरले जाऊ शकतात? आपल्या परराष्ट्र धोरणावर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर याचा परिणाम होऊ शकतो.