राज्याच्या राजकारणात राहणार – ममता बॅनर्जी

राज्याच्याच राजकारणात राहणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदींच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर त्यांनी खिल्ली उडवली.

राज्याच्याच राजकारणात राहणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. तसेच मोदींच्या चाय पे चर्चा कार्यक्रमावर त्यांनी खिल्ली उडवली. आम्ही लोकांशी रोजच संवाद साधतो. यात नवीन काय असा सवाल ममतांनी केला. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या अशा संधिसाधू राजकारणावर आमचा विश्वास नाही असे त्यांनी स्पष्ट केले.  लोकसभेच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची लढत काँग्रेस, भाजप आणि माकपशी आहे, असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या गैरकारभाराच्या विरोधात आम्ही तृणमूल काँग्रेसची स्थापना केली.  रस्त्यावर उतरल्यास जनतेची खडान्खडा माहिती होते, असेही बॅनर्जी म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mamata promises to take tmc to the national arena