Student Credit Card launched: बंगालच्या विद्यार्थ्यांना १० लाखांपर्यंत मिळेल कर्ज, ममता सरकारचा निर्णय

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (बुधवार) विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे.

Mamata Banerjee launches 'Student Credit Card' that offers educational loan up to Rs 10 lakh
सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले (संग्रहित – PTI)

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने आज (बुधवार) विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट क्रेडिट कार्ड सुरू केले. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साधारण वार्षिक व्याज दरावर जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या याची घोषणा करताना म्हणाल्या पश्चिम बंगालमधील विद्यार्थ्यांसाठी आज क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. पश्चिम बंगालमधील तरुणांनी स्वावलंबी होण्यासाठी या योजनेत साधारण वार्षिक व्याज दरावर १० लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.

हेही वाचा- करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावीच लागेल; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

कर्ज परत करण्यासाठी १५ वर्षाचा वेळ

याबाबत तृणमूल कॉंग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात वचन दिले होते. हे कर्ज भारत किंवा परदेशात पदवीधर, पदव्युत्तर, डॉक्टरेट आणि पोस्ट-डॉक्टरेटच्या अभ्यासासाठी उपलब्ध असेल. याची सर्वात महत्वाची बाब म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्याला हे कर्ज परत करण्यासाठी १५ वर्षाचा वेळ दिला जाईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mamata sarkar launch student credit card for student that offers educational loan up to rs 10 lakh srk

ताज्या बातम्या