धक्कादायक! सर्वोच्च न्यायालयासमोर माहिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न

भगवान दास रोडवरील गेट नंबर डी समोर एक महिला आणि एका पुरुषानं स्वतःला आग लावून घेतली.

Supreme-Court-Fire
सर्वोच्च न्यायालयासमोर माहिला आणि पुरुषाचा आत्मदहनाचा प्रयत्न (photo- ANI)

सर्वोच्च न्यायालयासमोर एक महिला आणि एका पुरुषानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भगवान दास रोडवरील गेट नंबर डी समोर एक महिला आणि एका पुरुषानं स्वतःला आग लावून घेतली. जखमी दोघांनाही राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सुरक्षेच्या दृष्टीने न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

“न्यायालयाच्या गेटवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी या दोघांना स्वतःला आग लावताना पाहिले. त्यानंतर ते लगेच आग विझवण्यासाठी ब्लॅंकेट घेऊन धावले. दोघांना तातडीने पोलीस व्हॅनमध्ये राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” असं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त दीपक यादव यांनी सांगितलं.

जखमी दोघंही गेट नंबर डी मधून न्यायालयात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याजवळ ओळखपत्र नसल्याने त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडवलं. तेवढ्यात त्या दोघांनी स्वतःला आग लावून घेतली. हे दोघं न्यायालय परिसरात आले तेव्हा त्यांच्या हातात एक बाटली होती, अशी माहिती मिळतीये. या बाटलीत ज्वलनशील पदार्थ असल्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या दोघांनी न्यायालय परिसरात आत्मदहन करण्याचा प्रयत्न का केला, याचाही तपास केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man and woman set themselves ablaze outside supreme court hrc

ताज्या बातम्या