घर गमावण्याच्या भीतीपोटी अमेरिकेत ३० वर्षाच्या तरुणाने तब्बल पाच महिने घरातच आजीचा मृतदेह लपवून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. घरात वास येऊ नये यासाठी त्या तरुणाने रुम फ्रेशनरचा वापर केला होता. वृद्धेच्या एका मुलीला संशय आला आणि तिने या प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली.

न्यूयॉर्कमधील क्वीन्समध्ये राहणा-या ८५ वर्षीय एरिका क्राऊस ब्रेसलीन यांचे दुमजली घर आहे. या घरात त्यांच्यासोबत त्यांचा नातू ख्रिस्तोफर फ्यूरर हादेखील राहत होता. मे महिन्यात एरिका यांचा घरात मृत्यू झाला. पण आजीचा मृत्यू झाल्याचे बाहेर समजले तर आपल्याला राहायला घर उरणार नाही अशी भीती ख्रिस्तोफरला होती. या भीती पोटी ख्रिस्तोफरने तब्बल पाच महिने आजीचा मृतदेह प्लास्टीकमध्ये गुंडाळून बेडरुममध्ये लपवून ठेवला. मृतदेहातून येणारी दुर्गंधी अन्यत्र पसरु नये म्हणून तो रुम फ्रेशनरचा वापर करत होता. तसेच त्याने मृतदेहाला रंगही दिला.  क्राऊस यांच्या एका मुलीला आईशी बोलणे होत नसल्याने संशय येत होता. अखेर तिने या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घरात धडक दिली. पोलिस दारात दिसताच फ्यूररने आजीचा मृत्यू झाल्याची कबूली दिली. पण घर गमावण्याची भीती असल्याने मी हा प्रकार कोणालाच सांगितला नाही असे त्याने सांगितले. पोलिसांनी मृत्यूची माहिती न देणे, मृतदेह घरात लपवणे या कलमांखाली फ्यूररला अटक केली आहे. एरिका यांचा मृत्यूमागे संशयास्पद काहीही आढळले नाही असे पोलिसांनी सांगितले. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी स्पष्ट केले.

एरिका क्राऊस यांनी फ्यूरर १७ वर्षांचा असताना त्याला आपल्या घरात आणले होते. क्राऊस या पूर्वी एका बेकरीत काम करायच्या. फ्यूरर निराधार असल्याने एरिकांनी त्याला घरात आणले होते. अन्य नातवंडापेक्षा फ्यूररा हा त्यांच्या सर्वात जवळचा होता असे त्यांच्या शेजा-यांनी सांगितले. क्राऊस या दिसत नसल्याने स्थानिकांनादेखील संशय येत होता. फ्यूरर हा मितभाषी होता पण तो आजीची खूप चांगली काळजी घ्यायचा असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द

Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा

goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!

pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?