लोकल ट्रेनमध्ये महिलेसमोर हस्तमैथुन करण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी २३ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. चेन्नईत ९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे. आरोपी लोकल ट्रेनमधील महिला डब्यात घुसून हस्तमैथुन करत होता.

आरोपीची ओळख पटली असून लक्ष्मणन असं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून रेल्वे पोलिसांच्या हवाली केलं आहे. प्रसिद्ध युट्यूब चॅनेलमध्ये काम करत असलेल्या महिला पत्रकाराने याप्रकरणी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक

तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलेने ९ वाजून ४० मिनिटांनी लोकल पकडली. ट्रेन पल्लवरम स्थानक गाठल्यानंतर आरोपी महिला डब्यात बसलेला असून हस्तमैथुन करत असल्याचं महिलेच्या लक्षात आलं. यानंतर महिलेने मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्ड करत त्याला हटकलं. पुढील स्टेशन आल्यानंतर आरोपी ट्रेनमधून उतरला आणि पळून गेला.

महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. यादरम्यान महिलेने युट्यूबवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करत लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलली पाहिजेत अशी मागणी केली.

“माझ्या गळ्यात ओळखपत्र होतं आणि मी पत्रकार असल्याचं माहिती असतानाही तो माझ्यासमोर हस्तमैथुन करत होता. सर्वात आधी तर त्याने महिला डब्यात चढायला नको होतं आणि त्यातही त्याचं हे कृत्य करण्याचं धाडस? मी ओरडली असताना त्याने बाहेर उडी मारुन पळ काढला. मी एकटी असताना त्याच्यासोबत अजून तीन चार जण असते तर काय झालं असतं? किमान या घटनेनंतर तरी सरकारने पावलं उचलावीत. महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही असावेत किंवा रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक उपस्थित असावा. जर तुमच्या समोर अशी घटना घडली तर वाचा फोडा, लाजू नका. यामुळे इतर महिलांमध्येही जागरुकता निर्माण होईल,” असं महिलेने सांगितलं आहे.