मुलीने इच्छेविरोधात लग्न केलं म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळलं

मुलीने इच्छेविरोधात लग्न केलं म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Indonesia banten jail fire 40 prisoners killed
(प्रातिनिधीक छायाचित्र)

मुलीने इच्छेविरोधात लग्न केलं म्हणून पित्याने कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानमधील एका व्यक्तीने त्याच्या दोन मुली आणि चार नातवंडांसह त्याच्या कुटुंबातील सात सदस्यांना जिवंत जाळलं. मुलीच्या प्रेमविवाहाला आरोपीचा विरोध होता आणि त्या रागातून त्याने हे कृत्य केलं. या घटनेत केवळ आरोपीचा जावई बचावला असून इतर सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंजूर हुसेन असे आरोपी व्यक्तीचे नाव आहे. त्यांने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुझफ्फरगढ जिल्ह्यात राहणाऱ्या मुलींच्या घराला आग लावली. या घरात त्याच्या मुली फौजिया बीबी आणि खुर्शीद माई त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. या आगीत फौजिया बीबी आणि खुर्शीद माई यांच्यासह त्यांचे पती आणि दोघींची चार अल्पवयीन मुले मरण पावली आहेत.

दरम्यान, बीबीचे पती मेहबूब अहमद घरी नसल्याने या घटनेतून बचावले असून त्यांनी सासरे मंजूर हुसेन आणि त्यांचा मुलगा साबीर हुसेन यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. “मी कामानिमित्त मुलतानमध्ये होतो. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा घराला आग लागलेली पाहिली. यावेळी मला मंजूर हुसेन आणि साबीर हुसेन हे दोघंही घटनास्थळावरून पळून जाताना दिसले.” असे मेहबूब अहमद यांनी पोलिसांना सांगितले. तसेच मेहबूब अहमद आणि बीबीने २०२० मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांच्या विवाहाला सासरे मंजूर हुसेन यांचा विरोध होता त्यामुळे ते खुश नव्हते. त्यातूनच त्यांनी घराला आग लावली. या घटनेत मेहमूद अहमद यांच्या पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.

“ही घटना प्रेम विवाहामुळे दोन कुटुंबांमधील शत्रुत्वाचा परिणाम म्हणून घडली आहे. आम्ही दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे,” असे पोलीस अधिकारी अब्दुल मजीद यांनी रॉयटर्सला सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Man burns alive 7 family members of daughter after marries against his wishes in pakistan hrc

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या