स्वत:ला प्रेषित म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेतील एका व्यक्तीने आपल्या मुलीसह २० मुलींशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सॅम्युअल रॅपीली बेटमन (46) असं या व्यक्तीचे नाव आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने ज्या मुलींशी विवाह केला, त्यापैकी अनेक मुलींचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असल्याची माहिती एफबीआयने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Suresh Abdul Video : खान सरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; कडक कारवाईची काँग्रेसची मागणी

एफबीआयच्या रिपोर्टनुसार, सॅम्युअल रॅपीली बेटमन हा मोरोन्स समाजाचा नेता होता. २०१९ मध्ये त्या स्वत:ला प्रेषित म्हणून घोषित केले. त्यानंतर त्याने २० मुलींशी विवाह केला. यापैकी अनेक मुलींचे वय १५ वर्षांपेक्षाही कमी आहे. तसेच यामध्ये त्याच्या स्वत:च्या मुलीचाही समावेश आहे. दरम्यान, कोलोरॅडो शहरातील त्याच्या घरी छापा टाकल्यानंतर या विवाहांसंदर्भातील अनेक पुरावे एफबीआयच्या हाती लागले आहेत. तसेच एफबीआयने त्याला अटक केली असून बेटमनला ऍरिझोना तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – पोटच्या लेकीशी लग्न, १५ वर्षीय मुलींशी सामूहिक शरीरसंबंध अन्.. देवाच्या नावावर केलेलं लज्जास्पद कृत्य उघड

यापूर्वी सप्टेंबरमध्ये बेटमनवर अल्पवयीन मुलींच्या तस्करीचे आरोप करण्यात आले होते. तो अॅरिझोना, उटाह, नेवाडा आणि नेब्रास्कातील अल्पवयीन मुलींना दुसऱ्या राज्यात नेऊन विकत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. दरम्यान, एफबीआयने पुन्हा त्याला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man calls himself as apostle married with 20 girls including his daughter fbi arrest spb
First published on: 05-12-2022 at 14:01 IST