scorecardresearch

पैशांचा माज? विमानातल्या प्रवासी महिलेला म्हणाला “८० लाख घे आणि…” मग स्वतःच ट्वीट करून सांगितलं नेमकं काय घडलं

डेल्टा एअरलाईन्सच्या विमानातील एका कोट्यधीस प्रवाशाने सहप्रवासी महिलेकडे विचित्र मागणी केल्याची घटना समोर आली आहे.

Delta Airlines
डेल्टा एअरलाईन्सच्या विमानात एका महिलेकडे सहप्रवाशाने विचित्र मागणी केली.

Man Misbehaves With Woman In Flight : विमानात प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या, राडा केल्याच्या, आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. तसेच विमानात महिला प्रवाशांसोबत गैरवर्तनाची प्रकरणंदेखील समोर येत आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जे वाचून तुम्हाला धक्का बसेल. डेल्टा एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये एका कोट्यधीश प्रवाशाने महिला प्रवाशाकडे एक विचित्र मागणी केली, जी ऐकून त्या महिलेला धक्का बसला. तसेच या व्यक्तीने नंतर स्वतःच ट्विट करून याची माहिती दिली.

डेल्टा एअरलाईन्सच्या विमानाने प्रवास करणाऱ्या कोट्यधीश प्रवाशाने सहप्रवासी महिलेला त्याची मागणी पूर्ण करण्याच्या बदल्यात ८० लाख रुपये देईन असं सांगितलं होतं. @stkirsch हे ट्विटर हँडल असलेल्या स्टीव्ह किसर्चने ट्विट केलं आहे की, “मी सध्या डेल्टा एअरलायन्सच्या विमानात आहे. माझ्या शेजारी एक महिला बसली आहे, जी एका फार्मा कंपनीत काम करते. मी तिला विमानाच्या उड्डाणावेळी चेहऱ्यावरील मास्क हटवण्यास सांगितले. त्याबदल्यात तिला मी १ लाख डॉलर्स (८० लाख रुपये) देईन अशी ऑफर दिली. परंतु या महिलेने नकार दिला. त्यानंतर मी तिला सांगितलं की, आता हे मास्क काही कामाचे नाहीत.”

हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद

…अखेर महिलेने मास्क हटवला

स्टीव्हने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केले आहेत. ज्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, महिलेने त्यांची इतकी मोठी ऑफर धुडकावली. तरीदेखील स्टीव्ह हे त्या महिलेला सतत मास्क हटवण्यास सांगत राहिले. अखेर फ्लाईटमध्ये जेव्हा नाश्ता देण्यात आला तेव्हा मात्र या महिलेने तिच्या चेहऱ्यावरील मास्क हटवला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 17:34 IST
ताज्या बातम्या