चित्रकलेचा उत्तम नमुना असलेल्या जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगला एका अज्ञात व्यक्तीने केक लावून विद्रूप करण्याचा प्रयत्न केला. अज्ञात व्यक्तीच्या या कृत्याचा व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असू पेंटिंगला खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भाजपात प्रवेश करण्याबाबत हार्दिक पटेल यांचं मोठं विधान, म्हणाले…

लिओनार्डो दा व्हिन्ची या महान चित्रकाराने मोनालिसा पेंटिंग साकारलेली आहे. ही पेंटिंग म्हणजे चित्रकलेचा सर्वोत्तम नमुना असल्याचे म्हटले जाते. सध्या ही पेंटिंग पॅरिसमधील लूव्रे या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहे. या पेंटिंगला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मात्र याच मोनालिसाच्या पेंटिंगला विद्रूप करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीने वृद्ध महिलेचे रुप धारण करुन व्हिलचेअरवर संग्रहालयात प्रवेश केला होता. त्यानंतर मोनालिसा पेटिंगसमोर येताच हा माथेफिरू चेअरवरुन उठला आणि डोक्यावरचे विग काढत त्याने मोनालिसा या पेंटिंगला केक लावला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. पेंटिंग पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला आहे. तसेच या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा >>> ‘How To Murder Your Husband’ निबंधाची लेखिका पतीच्या हत्येप्रकरणात दोषी; ११ न्यायाधिशांनी ८ तासांच्या चर्चेनंतर सुनावली शिक्षा

या घटनेनंतर संग्रहालयातील सुरक्षा रक्षकांनी पेंटिंगकडे धाव घेतली. तसेच केक लावून पेंटिंग खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माथेफिरूला नंतर संग्रहालयातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने केक पेंटिंगच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या काचेवरच लागला असून मोनालिसा या जगप्रसिद्ध पेंटिगची कुठलीही हानी झालेली नाही.

हेही वाचा >>> नेपाळमधील अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले; अंगावर काटा आणणारे PHOTO आले समोर

याआधीही या पेंटिगला खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. १९५६ साली या पेंटिंगवर सल्फ्यूरिक अॅसिड टाकण्यात आले होते. ज्यामुळे पेंटिंगचा काही भाग खराब झाला होता. तेव्हापासून मोनालिसा पेंटिंगला बुलेटप्रूफ काचेच्या मागे ठेवण्यात आले आहे. मोनालिसा ही चित्राकृती जगातील सर्वोत्तम संरक्षित कलाकृतींपैकी एक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man dressed as woman sitting on wheelchair tires vandalised mona lisa painting with cake at louvre museum prd
First published on: 30-05-2022 at 12:02 IST