scorecardresearch

वर्ल्डकप फायनल पाहताना टीव्ही बंद केला अन्…; वडिलाने पोटच्या मुलाचा केला भयावह शेवट

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहत असताना टीव्ही बंद केल्याच्या कारणातून एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे.

crime
(सांकेतिक फोटो)

विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना पाहत असताना टीव्ही बंद केल्याच्या कारणातून एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलाची हत्या केली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना पीडित मुलाने टीव्ही बंद केला. यावरून बापलेकामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर वडिलांनी विजेच्या तारेनं गळा आवळून मुलाची हत्या केली. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर येथील ही घटना आहे. घटनेच्या दिवशी रविवारी (१९ नोव्हेंबर) आरोपी गणेश प्रसाद आपल्या घरी टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील विश्वचषकाचा अंतिम सामना पाहत होता. यावेळी पीडित मुलगा दीपक निषाद याने वडिलांना स्वयंपाक करण्याची विनंती केली. पण वडील मॅच पाहण्यात मग्न होते.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: शानदार इनिंग खेळूनही विराट दिसला नाराज, कपाळावर मारुन घेतानाचा VIDEO व्हायरल
England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
Men Tie Rope Around Monkey’s Neck
अत्याचाराचा कळस! माकडाच्या गळ्यात दोरी बांधून जीव जाईपर्यंत नेलं फरपटत, VIRAL व्हिडीओ पाहताच संतापले लोक
Shreyas Iyer misses India vs Pak match due to injury
IND vs PAK: श्रेयस अय्यरला पुन्हा दुखापत झाल्याने हरभजन सिंग संतापला, एनसीएवर उपस्थित केला सवाल

हेही वाचा- खळबळजनक: दोघांचं एकाच तरुणीवर जडलं प्रेम, बड्या उद्योजकाच्या मुलाने मित्राची केली हत्या

आधी स्वयंपाक करा मग सामना बघत बसा, असं मुलाने वडिलांना सांगितलं. पण वडील सामना पाहण्यात दंग असल्याने त्यांनी मुलाच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. यामुळे संतापलेल्या दीपकने थेट टीव्ही बंद केला. परिणामी त्यांच्यात वादावादी झाली आणि या वादाचं रुपांतर शारिरीक बाचाबाचीमध्ये झालं. त्यानंतर आरोपी वडीन गणेशने विजेच्या तारेने मुलाचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला होता पण कानपूर पोलिसांनी त्याला पकडलं.

हेही वाचा- लोखंडी साखळीने हातपाय बांधले अन्…; विदेशी तरुणीला भारतात भेटायला बोलावून केला रक्तरंजित शेवट

चकेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) ब्रिज नारायण सिंह यांनी सांगितलं की, दीपक आणि गणेश यांच्यात दारू पिण्याच्या सवयीवरून वारंवार वाद होत होता. दरम्यान, रविवारी क्रिकेट सामना पाहण्यावरून झालेल्या वाद हे तत्काळ कारण ठरलं. आरोपी वडिलांना ताब्यात घेण्यात आलं असून मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man killed son for switch off tv while watching world cup final ind vs aus rmm

First published on: 21-11-2023 at 21:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×