scorecardresearch

सात वर्षांच्या मुलीच्या हत्येने कोलकातामध्ये तणावाचे वातावरण, नरबळीचा संशय, जमावाकडून दगडफेक-जाळपोळ

एका नरबळी प्रकरणामुळे कोलकाता शहर हादरलं आहे. कारवाईच्या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरले असून तिलजला आणि बालीगंज परिसरात संतप्त जमावाने जाळपोळ केली.

tiljala murder case
तिलजला हत्याकांडामुळे कोलकात्यात खळबळ, नागरिक उतरले रस्त्यावर!

कोलकात्यामधील तिलजला परिसरात एका ७ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर शहरात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी काल (२७ मार्च) बुंदेल गेट येथे जोरदार आंदोलन आणि घोषणाबाजी केली. पार्क सर्कस आणि बालीगंज येथे रास्ता रोको करून वाहतूक विस्कळीत केली होती. तसेच संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक देखील केली. दरम्यान, हे नरबळी प्रकरण असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

कोलकात्यामधील तिलजला परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर लोकांमध्ये आक्रोश दिसत आहे. या हत्येनंतर नागरिकांमध्ये पोलिसांविरोधात रोष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपासून स्थानिकांनी तिलजला आणि बालीगंज परिसरात जोरदार आंदोलन केलं. दरम्यान, या घटनेला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे नरबळी प्रकर असावं. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपी आलोक कुमार याला मूलबाळ नव्हतं. त्याच्या पत्नीचा तीनवेळा गर्भपात झाला आहे. त्यामुळे तो आणि त्याची पत्नी एका तांत्रिकाकडे गेले. त्यानंतर तांत्रिकाने त्यांना नरबळी देण्यास सांगितलं होतं

हे ही वाचा >> “कपटाने मिळवलेली सत्ता गेल्यानेच उद्धव ठाकरेंना वीर सावरकर…” व्हिडीओ पोस्ट करत भाजपाचा आरोप

जमावाकडून तिलजला, बालीगंज परिसरात तोडफोड आणि जाळपोळ

तक्रारीनंतर पोलिसांनी शोधाशोध सुरू केली, शोध मोहीम सुरू असताना रविवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांना घेराव घातला. जमावाने पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. जमाव एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी तिलजला पोलीस ठाण्याची तोडफोड केली. अनेक ठिकाणी जमावाने टायर्स जाळले. तिलजला, बालीगंज परिसरात मोर्चे काढण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 18:40 IST

संबंधित बातम्या