Man Rapes 3 Year Old Girl in Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील कंबलादिन्ने गावात एका ३ वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पीडितेचे पालक लग्नाला गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पीडितेचे आई-वडील लग्नाला गेले होते. तेव्हा ही चिमुकली घराबाहेर खेळत होती. आरोपीने या मुलीला केळीचं आमिष दाखवून एका निर्जन भागात नेलं. तिथं जाऊन त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. या प्रकरणाची कुठेही वाच्यता होऊ नये म्हणून त्याने नंतर तिची हत्याही केली. दरम्यान, पीडितेचे पालक लग्नाहून घरी परतल्यानंतर तिचा शोध घेऊ लागले. परंतु ती कुठेच सापडली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर, गावकऱ्यांना या मुलीचा मृतदेह काटेरी झुडपात सापडला. स्थानिकांनी आरोपीला पकडून मैलावरम पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.