Man Suicide in UP After Recorded Video : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डीएलएफ कॉलनीत राहणाऱ्या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. “दुनिया में कुछ भी कर लेना, पर शादी मत करना (आयुष्यात जे हवं ते करा, पण लग्न कधीच करू नका)” असं म्हणत या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी दोन व्हिडिओ रेकॉर्ड केले. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पीडित जगजीत सिंग राणा हे बुलंदशहरच्या नरसैना भागातील रहिवासी होते. ते एका फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. तसंच, औषध पुरवठ्याचा व्यवसाय करत होते. पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला ते इतका त्रासून गेले की त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलमध्ये दोन व्हिडिओ रेकॉर्ड केले. सिंग यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेला आढळल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला. तपासादरम्यान पोलिसांना आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेले दोन व्हिडिओ सापडले.

Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
pimpri chinchwad police solve murder case
पिंपरी- चिंचवड: धमकी, मारहाणीला कंटाळून मित्राची हत्या; केला असा प्लॅन..पण पोलिसांनी पाठलाग करून….
pune vanchit Bahujan aghadi
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
Union Minister L Murugan visited the youth home
“त्यांनी माझ्या मुलाचं जानवं कापलं आणि म्हणाले पुन्हा…”, दिव्यांग मुलाच्या वडिलांची तक्रार; तमिळनाडू पोलिसांनी मात्र दावा फेटाळला
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित

हेही वाचा >> Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओमध्ये जगजीतने सांगितले होते की, सासरच्या लोकांमुळे त्याला जीवाची भीती वाटत होती आणि ते त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडत होते. तीन मिनिटे चार सेकंदांच्या व्हिडिओमध्ये त्याने बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात आपले सासरे राहत असल्याचे नमूद केले आहे. “माझी पत्नी आणि सासरच्या लोकांकडून होणारा छळ असह्य झाल्याने मी आत्महत्या करत आहे”, असं जगजीतने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तो पुढे म्हणाला की त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांनी दिलेल्या यातना मी वर्णन करू शकत नाही. त्यांना माझे तोंड दाखवू नका.”

आयुष्यत हवं ते करा पण लग्न करू नका

मृत्यूपूर्वी जगजितसिंग राणा किती तणावात होते, हे त्यांच्या व्हिडिओवरून स्पष्ट झालंय. आपल्या मालमत्तेत कोणालाही वाटा देऊ नये, त्या लोकांना आपले तोंड दाखवू नये, असेही ते म्हणाले. पोलीस आणि प्रशासनाने त्यांचे अंतिम संस्कार स्वतः करावेत आणि कोणालाही तोंड दाखवू नये, अशी विनंती त्यांनी केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये जगजीत सिंग पंख्याला फास बांधून गळ्यात फास घालताना दिसत आहेत. सगळ्यांना शेवटचा संदेश म्हणून जगजीत म्हणाला, “आयुष्यात जे काही हवे ते करा, पण लग्न करू नका. जय श्री राम.”

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींवर कारवाई करण्यापूर्वी ते सिंग यांच्या कुटुंबीयांकडून तक्रारीची वाट पाहत आहेत.