scorecardresearch

Premium

विमान हवेत असताना तुफान राडा; प्रवाशाला कपडे फाटेपर्यंत मारहाण, VIDEO व्हायरल

गुवाहाटीहून अगरतळाला येणाऱ्या विमानात एका प्रवाशाने गोंधळ घातला आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे.

man beaten up in flight
प्रवाशाने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला ( फोटो-ट्विटर)

गुवाहाटीहून अगरतळाला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित प्रवाशाने अमली पदार्थांच्या नशेत विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यानंतर सहप्रवाशांनी संबंधित प्रवाशाला मागे खेचत मारहाण केली. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुरुवारी गुवाहाटीहून अगरतळाला येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमानात एकच गोंधळ उडाला. यावेळी संबंधित प्रवाशाने अमली पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप आहे.

An interesting offer has been announced for passengers not to get up from their seats in the plane
Video :विमानात प्रवाशांना अनाउन्समेंटबरोबर दिली‌ खास ऑफर !
indigo airlines
विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?
Mumbai Airport accident
मुंबई विमानतळावर दुर्घटना, धावपट्टीवरून विमान घसरल्याने लागली आग; अपघाताचा VIDEO आला समोर
Plane crashes into sea video goes viral on social media Plane accident news
VIDEO : बापरे! विमान चक्क समुद्रात कोसळलं, लोकं सैरावैरा पळत सुटले; पाहा, अंगावर काटा येणारा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा- नागपूर मेट्रोत तरुणाने ‘बेकरार करके हमे’चा सीन केला रिक्रिएट, भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत विमानाचे क्रू मेंबर्स आणि इतर काही प्रवासी आरोपी तरुणाला धरून ठेवताना दिसत आहे. आरोपी तरुणाचे कपडे फाटल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या गोंधळानंतर एका पुरुष क्रू मेंबरने संबंधित प्रवाशाला ओढत दुसरीकडे नेलं. यावेळी संतापलेल्या काही प्रवाशांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण क्रू मेंबर्संनी मारहाण न करण्याची विनंती केली.

त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते ज्योतिस्मान दास चौधरी यांनी सांगितलं की, ४१ वर्षीय आरोपी देवनाथ हा गुवाहाटी-अगरतळा इंडिगो फ्लाइटमध्ये होता. त्याने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सतर्क झालेल्या इतर प्रवाशांनी आरोपीला मागे खेचले. या प्रकारानंतर क्रू मेंबर्सनी आरोपी देवनाथ याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. पण त्याने क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केलं. अगरतळा विमानतळावर विमान उतरल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रवाशाला अटक केली आहे. याबाबतचं वृत्त ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man tried to open emergency door guwahati agartala indigo flight beaten up by co passenger viral video rmm

First published on: 21-09-2023 at 20:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×