नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या कथित अबकारी धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज येथील न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. प्रथमदर्शनी सिसोदिया या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचा सूत्रधार असल्याचे दिसत आहेत, असे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले. सिसोदिया यांची सुटका केल्यास सध्या सुरू असलेल्या तपासावर विपरीत परिणाम होऊन त्याच्या प्रगतीस गंभीर बाधा निर्माण होण्याचा धोका असल्याचे न्यायालयाने नमूद केले. सुनावणीच्या या टप्प्यावर सिसोदियांची जामिनावर मुक्तता करण्यास अनुकूल नसल्याचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी सांगितले.