पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वर्षाच्या शेवटच्या मन की बात कार्यक्रमात देशाला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी करोना महामारीपासून विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही स्मरण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरुण रुग्णालयात होते, त्यावेळी मी सोशल मीडियावर काहीतरी पाहिले, जे माझ्या हृदयाला भिडले. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. या सन्मानानंतर त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले. हे पत्र वाचून माझ्या मनात पहिला विचार आला की यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते मुळ गोष्टी विसरले नाहीत. दुसरे म्हणजे, जेव्हा त्यांच्याकडे आनंद साजरा करण्यासाठी वेळ होता तेव्हा त्यांनी पुढील पिढ्यांची काळजी केली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्या पत्रात विद्यार्थ्यांसाठी काय संदेश होता?

“सामान्य असणे ठीक आहे. प्रत्येकजण शाळेत उत्कृष्ट असेलच असे नाही आणि प्रत्येकजण ९० टक्के गुण मिळवू शकणार नाही. जर तुम्ही असे केले तर ही एक आश्चर्यकारक कामगिरी आहे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे,” असे वरुण सिंह यांनी पत्रात म्हटले होते.

“पण जर तुम्ही ते करू शकत नसाल, तर असे समजू नका की तुम्ही सामान्य आहात, असे पत्रात म्हटले आहे. तुम्ही शाळेत सामान्य असू शकता पण याचा अर्थ असा नाही की जीवनातील गोष्टी समान असतील. तुमच्या हृदयाचा आवाज ऐका. तो कला, संगीत, ग्राफिक डिझाइन, साहित्य इत्यादी असू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल, समर्पित व्हा, सर्वोत्तम करा. मी आणखी प्रयत्न करू शकलो असतो असा विचार करून कधीही झोपू नका,” असे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांनी लिहिले होते.

दरम्यान, वास्तविक, वरुण सिंह यांनी शौर्य चक्र प्रदान केल्यानंतर काही आठवड्यांनंतर १८ सप्टेंबर रोजी चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अनेक प्रेरणादायी गोष्टी लिहिल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mann ki baat program prime minister modi recalled group captain varun singh
First published on: 26-12-2021 at 16:55 IST