Premium

मान्सून लांबला! केरळ किनारपट्टीवर दोन ते तीन दिवसांनी दाखल होण्याची शक्यता

केरळात मान्सून लांबल्याने महाराष्ट्रातही उशिरा पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे.

India Mansoon Delayed
मान्सून

India Mansoon Delayed : भारतीय हवामान खात्याने चार जूनला मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. पण, मान्सूनला केरळ किनारपट्टीवर दाखल होण्यासाठी आणखी २ ते ३ दिवसांचा वेळ लागण्याची शक्यता हवामान विभागाने सोमवारी ( ५ जून ) वर्तवली आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना आणखी काही दिवस उन्हाची झळ सोसावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण, “अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर मान्सूनला अनुकूल वातावरण तयार होण्यास अडथळा होत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनचे आगमन होऊ शकते,” असं हवामान विभागातील अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mansoon arrives two three day in kerala coast say weather official ssa

Next Story
स्वीडनमध्ये खरंच सेक्स चॅम्पियनशिप आयोजित केली जाणार? जाणून घ्या सत्य