लसीकरणासाठी कायपण! आरोग्य कर्मचाऱ्यांनी थेट शेतात जाऊन टोचली करोना प्रतिबंधक लस

या अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवरही लसीकरण केलं जात होतं.

Vaccine at farm
हा फोटो राजस्थानमधल्या अलवार भागातला असल्याचं मांडविय यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

देशात सध्या करोना प्रतिबंधक मोहिमेने चांगलाच वेग घेतल्याचं चित्र आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या हर घर दस्तक योजनेच्या अंतर्गत घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणच्या रेल्वे स्थानकांवरही लसीकरण केलं जात आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी थेट शेतात जाऊन तिथे काम करणाऱ्या महिलांचं लसीकरण केलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. ह्या फोटोत एक महिला आरोग्य कर्मचारी शेतात काम करणाऱ्या महिलेला लस टोचताना दिसत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या अलवार भागातला असल्याचं मांडविय यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

करोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना असलेल्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी केंद्राच्या आरोग्य विभागाने हर घर दस्तक अभियान राबवलं आहे. या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर घरोघरी जाऊन लसीकरण करत आहेत. या अभियानांतर्गत गेल्या महिन्यात नवी मुंबईतल्या वाशी आणि नेरुळ रेल्वे स्थानकावर लसीकरण केंद्र उभारुन तिथे लस देण्याचं काम सुरू होतं. रेल्वे स्थानकासोबतच जम्बो कोविड सेंटर, नागरी आरोग्य केंद्रे, मॉल्स, एपीएमसी मार्केट इथंही लसीकरण केंद्रे उभारुन लसीकरण केलं जात होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mansukh mandviya tweet covid 19 vaccination in farm vsk

ताज्या बातम्या