एअरसेल- मॅक्सिस सौद्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारन, त्यांचे भाऊ कलानिधी मारन व इतर चौघांविरुद्ध खटला चालवण्याइतपत पुरेसा आक्षेपार्ह पुरावा असल्याचे सांगून विशेष न्यायालयाने त्यांना आरोपी म्हणून समन्स जारी केले आहे.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश ओ.पी. सैनी यांनी मारन बंधूंशिवाय कलानिधी यांची पत्नी कावेरी कलानिधी, साऊथ एशिया एफएम लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक के. षण्मुगम, तसेच एसएएफएल व सन डायरेक्ट टीव्ही प्रा.लि. यांनाही आरोपी म्हणून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सध्याचा तपास सुरूच ठेवून आवश्यकता भासल्यास नव्याने तक्रारी दाखल करून घ्याव्यात, असे न्यायालयाने सांगितले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली सहाजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.