एअर इंडियाचं विमान AI 2379 च्या पायलट इन कमांडचा लॅब टेस्ट मारिजुआना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हे तेच फुकेत-दिल्ली फ्लाईट आहे जे ४ ऑगस्टला जवळपास ३०० फूट खाली आलं होतं. या घटनेमध्ये १७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले होते.
४ ऑगस्टला घडलेली घटना काय?
एअर इंडियाचं फुकेत-दिल्ली विमान क्रमांक AI2379 हे विमान ३०० फूट खाली आलं होतं. ज्यानंतर १७ प्रवासी आणि क्रू मेंबर जखमी झाले होते. याच विमानाचा मुख्य वैमानिक गांजा पिऊन विमान चालवत होता ही बाब आता समोर आली आहे. कारण या वैमानिकाची मारिजुआना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. ही घटना घडल्यानंतर दोन्ही वैमानिकांची सायको अॅक्टिव्ह सब्सटेन्स स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. प्राथमिक तपासात काहीही समोर आलं नाही. पण याबाबतचा विस्तृत अहवाल जेव्हा समोर आला तेव्हा मुख्य वैमानिकाची मारिजुआना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
३०० फूट खाली आलं होतं विमान
१४५ प्रवाशांसह प्रवास करणारे हे एअरबस ए३२० विमान ओदिशाजवळ भीषण संकटात अडकले आणि अचानक ३०० फूट खाली आलं होतं. दिल्लीत उतरल्यानंतर १३ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्सना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या घटनेची चौकशी केली असून, वैमानिकांची तात्पुरती ड्युटी थांबवण्यात आली आहे. DGCA नियमांनुसार, पहिल्यांदा दोषी आढळल्यास वैमानिकाला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं जातं. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना ३ वर्षांसाठी निलंबित होतो, तर तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास परवाना कायमचा रद्द केला जातो.
विमान अचानक खाली आल्याने अपघात
विमान खाली आले. विमान अचानक खाली आल्याने विमानाच्या छताला प्रवासी धडकले. यात १० प्रवासी आणि ४ कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने हे विमान सुरक्षितपणे उतरविण्यात आले. दिल्लीत विमान उतरण्यापूर्वी काही वेळेआधीच ते अचानक खाली येऊ लागले आणि हवेत जोरात डगेमगू लागले. यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाशांनी आरडाओरड केला. काही वेळासाठी विमानात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वैमानिकाने मोठ्या कौशल्याने आणि धैर्याने विमान सुरक्षित उतरविले
