Mark Zuckerberg gatecrash donald trump oval office meeting : मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस येथील ओव्हल कार्यालयातून बाहेर जायला सांगण्यात आल्याची बाब समोर आली आहे. जगातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कार्यालयात ट्रम्प हे उच्चपदस्थ लष्करी अधिकार्‍यांबरोबर बैठक घेत असताना झकरबर्ग अचानक खोलीत शिरल्याने त्यांना बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

एनबीसी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, एअर फोर्सच्या नेक्स जनरेशन फायटर जेट प्लॅटफॉर्म बद्दल चर्चा सुरू असताना अचानक झुकरबर्ग ओव्हल कार्यालयात शिरल्याने वरिष्ठ लष्करी अधिकारी थक्क झाले होते. ही कथित घटना नेमकी कधी घडली याबद्दल अद्याप स्पष्टता मिळू शकलेली नाही.

झुकरबर्ग यांच्या उपस्थितिमुळे अधिकारी चिंतेत पडले होते, त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा परवानगी त्यांच्याकडे नव्हती, असे रिपर्टमध्ये म्हटले आहे. त्यानंतर झकरबर्ग यांना बैठक सुरू असलेल्या खोलीतून बाहेर जाण्यास आणि ओव्हल कार्यालयाच्या बाहेर थांबून वाट पाहण्यास सांगण्यात आले.

नेमकं काय घडलं?

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने मात्र मार्क झुकरबर्ग यांना ओव्हल ऑफिस सोडण्यास सांगण्यात आल्याच्या दाव्यांचे खंडन केले आहे. या घटनेबद्दलच्या बातम्यांमधून नेमके काय घडले त्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे.

‘झुकरबर्ग हे राष्ट्रध्यक्षांच्या विनंतीवरून ‘हॅलो’ म्हणण्यासाठी आत आले होते आणि त्यानंतर त्यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांबरोबची (POTUS) बैठक सुरू होईपर्यंत वाट पाहण्यासाठी निघून गेले, जी वैमानिकांबरोबरची बैठक झाल्यानंतर नियोजित करण्यात आलेली होती,’ असे एका अधिकार्‍याने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्क झुकरबर्ग यांचा राजकारणाशी संबंध काहीसा गुंतागुंतीचा राहिला आहे. झकरबर्ग यांचा प्रो-इमिग्रेशन धोरण आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा दिला होता पण नंतर गेल्या वर्षी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे दुसर्‍यांदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले तेव्हा ते ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अजेंड्याकडे सरकले. ट्रम्प यांनी जानेवारीत पदभार स्वीकारला त्या दिवशीच्या सोहळ्याला देखील झकरबर्ग यांनी हजेरी लावली होती, यावेळी त्यांच्याबरोबर इतर अब्जाधीश जसे की जेफ बेझोस आणि एलॉन मस्क हे देखील होते.