scorecardresearch

“पाच वर्षांखालील मुलांसाठी मास्कची शिफारस नाही, मात्र… “; केंद्राकडून सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी

१२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असलेलेल्या सर्वांनी मास्क वापरला पाहिजे, असेही सांगितले गेले आहे.

(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

केंद्र सरकारने म्हटले आहे की, करोना संसर्गाची तीव्रता असुनही, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. आणि जर स्टिरॉइड्सचा वापर केला जात असेल तर त्यांना ​​​​सुधारणेच्या आधारावर १० ते १४ दिवसांमध्ये डोस कमी केला पाहिजे.

आरोग्य मंत्रालयाने ‘मुले आणि किशोरवयीन (१८ वर्षाखालील) वयोगटासाठी कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सुधारित व्यापक मार्गदर्शक तत्त्वे’ मध्ये असेही म्हटले आहे की, पाच वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस केलेली नाही. मात्र हे देखील सांगितले गेले आहे की, आई-वडिलांच्या देखरेखीत ६ ते ११ वयोगटातील मुले सरिक्षित आणि योग्य पद्धतीने मास्कचा वापर करू शकतात.

आरोग्य मंत्रालयाकडूनव सांगण्यात आले आहे की, १२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील असलेलेल्यांनी मास्क वापरला पाहिजे. विशेषत: ओमायक्रॉन प्रकारांमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढ लक्षात घेऊन तज्ञांच्या गटाने मार्गदर्शक तत्त्वांचे सुधानरणा केलेली आहे.

मंत्रालयाने सांगितले की, इतर देशांतील उपलब्ध डेटावरून असे दिसून येते की ओमायक्रॉनमुळे होणारा आजार कमी गंभीर आहे. तथापि, महामारीच्या लाटेमुळे दक्षता बाळगणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Masks not recommended for children aged below 5 govt issues revised covid guidelines msr

ताज्या बातम्या