scorecardresearch

Earthquake Philippines: टर्की, न्यूझीलंडपाठोपाठ आता फिलीपीन्स हादरलं, ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के

भूकंपामुळे टर्की आणि सीरिया हे दोन देश हादरले आहेत. त्यानंतर बुधवारी न्यूझीलंड आणि आज फिलीपीन्स हे दोन देश ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने हादरले आहेत.

Earthquake Hits central Philippines
फिलीपीन्समध्ये ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. (PC : Indian Express and Twiiter/@LastQuake)

फिलीपीन्सच्या मासबेट भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे झालेल्या वित्त अथवा जीवितहानीबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच त्सुनामीचा कोणताही इशारा मिळालेला नाही. अलिकडेच टर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपात ४१,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल (बुधवार) न्यूझीलंडमध्ये देखील ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता.

गेल्या महिन्यातही फिलीपीन्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेव्हा भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्टर स्केल इतकी होती. फिलीपीन्सच्या मास्बेट भागात भूकंप आल्याचे यूएसजीएसने सांगितले.

हे ही वाचा >> डीएमके नगरसेवकाच्या मारहाणीत भारतीय जवानाचा मृत्यू, ६ जणांना अटक, नगरसेवक फरार

टर्कीतल्या भूकंपात ४१,००० लोकांचा मृत्यू

दरम्यान गेल्या आठवड्यात अग्नेय टर्की आणि वायव्य सीरियात ७.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत ४१,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड देश हा एकाच वेळी भूकंप आणि चक्रीवादळाच्या तडाख्याने हादरला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 11:14 IST