Mauritius FSC on Hindenburg Research allegations againts SEBI chief : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्या वर्षी अदाणी समूहावर गंभीर आरोप करून खळबळ उडवली होती. हिंडेनबर्ग रिसर्चने आता सेबीच्या विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच व त्यांच्या पतीची अदाणी घोटाळ्यातील आर्थिक गैरव्यवहारासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांमध्ये भागीदारी असल्याचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानुसार या दोघांनी अदाणी मनी सायफनिंग घोटाळ्यात वापरलेल्या ऑफशोर फंडात भागिदारी घेतली होती. त्यामुळेच देशात इतका मोठा घोटाळा होऊनही सेबीने याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. उलट सर्व पुरावे देऊनही सेबीने हिंडेनबर्गलाच नोटीस बजावली.

हिंडेनबर्गने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे की “अदाणी प्रकरणाचा अहवाल जाहीर करून १८ महिने उलटले आहेत. आम्ही आमच्या अहवालाद्वारे या प्रकरणातील मॉरिशस आधारित शेल कंपन्यांचा मोठा संबंध उघड केला आहे. अब्जावधी डॉलर्सचा गैरव्यवहार, अघोषित गुंतवणूक व शेअर्समध्ये फेरफार करण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला गेला आहे.” या प्रकरणात मॉरिशसचा उल्लेख आल्यामुळे मॉरिशसला यावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. मॉरिशसच्या फायनॅन्शियल सर्व्हिस कमिशनने (FSC) म्हटलं आहे की “ज्या फंडांचा या प्रकरणात उल्लेख केला गेला आहे त्याच्याशी मॉरिशसचा काडीमात्र संबंध नाही.”

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : रतन टाटांच्या निधनानंतर टाटा सन्सच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया; म्हणाले, “टाटा समूहच नाही तर राष्ट्राची रचना…”
14th October Rashi Bhavishya In Marathi
१४ ऑक्टोबर पंचांग: इच्छापूर्ती की जिद्द-चिकाटी? पंचांगानुसार आज…
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?
hasan hasarallah death effect on india
हिजबुल प्रमुखाच्या हत्येनंतर संघर्ष पेटणार? भारतासह इतर देशांवर काय परिणाम होणार?
lokmanas
लोकमानस: दशकभरात चीनबाबत धोरणलकवा
Jagan Mohan reddy
Tirupati Laddu Row : “…तर दूरगामी परिणाम होतील”, लाडूप्रकरणावरून जगनमोहन रेड्डींनी पंतप्रधानांना पत्र लिहित व्यक्त केली भीती
Joe Biden maintains Donald Trumps India-policy and takes it to the heights
बायडेन यांनी ट्रम्प यांचे भारत-धोरण राखले आणि उंचीवर नेले…

एफएससीने एक निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “हिंडेनबर्ग सिसर्चने सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरोधात आरोप करताना ज्या ऑफशोर फंडांचा उल्लेख केला आहे, त्या फंडांशी माॉरिशसचा कसलाही संबंध नाही. कारण आमच्या देशात शेल कंपन्यांना काम करण्याची परवानगी दिली जात नाही. अशा कंपन्या आमच्या देशात अस्तित्वात नाहीत. हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आम्ही पाहिला असून यामधील मॉरिशस स्थित शेल कंपन्यांचा उल्लेख आहे, जो चुकीचा आहे. तसेच आमच्या देशाची Tax Haven अशी प्रतिमा बनवली जात आहे.”

हे ही वाचा >> बुच-अदानी लागेबांधे उघड; ‘इंडियन एक्स्प्रेस’ला मिळालेल्या नोंदींमधून स्पष्ट

हिंडेनबर्ग रिसर्चचे सेबी अध्यक्षांवर आरोप काय?

हिंडेनबर्ग रिसर्चने सादर केलेल्या नव्या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधबी बूच आणि त्यांचे पती धवल बूच यांनी अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित परदेशी संस्थांमध्ये भागीदारी केली होती असा आरोप केला आहे. माधवी व धवल बूच यांनी परदेशात बर्म्युडा व मॉरिशस येथील अदानी समुहाशी संबंधित कंपन्यांमध्ये भागीदारी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.