मुंबई : बांगलादेशात गोवरच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून या परिस्थितीने भारतासह दक्षिण आशियाई देशांसाठी इशारा दिला आहे. लसीकरणातील तुटी आणि कोविड-१९ नंतर विस्कळीत झालेल्या आरोग्य सेवांमुळे हा उद्रेक अधिक गंभीर बनला आहे. कोविडनंतर नियमित लसीकरण मोहिमा विस्कळीत झाल्याने ‘इम्युनिटी गॅप’ निर्माण झाली.परिणामी गोवरसारख्या आजारांना पुन्हा फैलावाची संधी मिळाली आहे.
काही ठिकाणी लसपुरवठा कमी पडणे तर काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेतील अडचणी यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.भारताने गेल्या काही वर्षांत लसीकरण मोहिमांमध्ये प्रगती केली असली तरी काही भागांमध्ये अजूनही लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने भारतासाठीही ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार २०२६ च्या सुरुवातीपासून बांगलादेशात हजारो संशयित गोवर रुग्ण आढळले असून अनेक प्रकरणांची पुष्टी झाली आहे. या उद्रेकाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असून मृत्यूंची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत आहे.तज्ज्ञांच्या मते, गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किमान ९५ टक्के लोकसंख्येला लसीचे दोन डोस देणे आवश्यक असते. मात्र बांगलादेशात लसीकरणाचे प्रमाण काही भागांत अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. विशेषतः ग्रामीण आणि दुर्लक्षित भागांमध्ये अनेक मुले लसीपासून वंचित राहिली आहेत.
कोविड-१९ महामारीनंतर नियमित लसीकरण मोहिमा विस्कळीत झाल्याने ‘इम्युनिटी गॅप’ निर्माण झाली. परिणामी गोवरसारख्या आजारांना पुन्हा फैलावाची संधी मिळाली. काही ठिकाणी लसपुरवठा कमी पडणे, तर काही ठिकाणी आरोग्य यंत्रणेतील अडचणी यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.
दरम्यान, भारतासाठीही ही परिस्थिती धोक्याची घंटा मानली जात आहे. भारताने गेल्या काही वर्षांत लसीकरण मोहिमांमध्ये प्रगती केली असली तरी काही भागांमध्ये अजूनही लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. शहरी झोपडपट्ट्या, दुर्गम ग्रामीण भाग आणि स्थलांतरित लोकसंख्या यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचण्यात अजूनही अडथळे आहेत. गोवरचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरतो.
एका बाधित व्यक्तीकडून अनेक अप्रमाणित व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे छोटा उद्रेकही मोठ्या साथीत रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे डॉक्टराचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर, भारताने लसीकरणातील तुटी भरून काढणे, प्रभावी रोगनियंत्रण यंत्रणा मजबूत करणे आणि जनजागृती वाढवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.बांगलादेशातील सद्यस्थिती ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सातत्य आणि सजगतेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. योग्य वेळी उपाययोजना न केल्यास टाळता येणारे आजारही गंभीर स्वरूप धारण करू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
