scorecardresearch

तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना; ‘एनसीईआरटी’च्या अहवालात विविध शिफारशी

शालेय शिक्षण प्रक्रियेत तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे सहजतेने एकत्रीकरण करण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना; ‘एनसीईआरटी’च्या अहवालात विविध शिफारशी
‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’

पीटीआय, नवी दिल्ली

शालेय शिक्षण प्रक्रियेत तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे सहजतेने एकत्रीकरण करण्यासाठी ‘राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’ने (एनसीईआरटी) विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तृतीयपंथी विद्यार्थ्यांसाठी लिंगभाव विरहित गणवेश, तृतीयपंथी समावेश अभ्यासक्रम, सुरक्षित स्वच्छतागृह या विविध सुविधांसह लिंगआधारित हिंसा रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याच्या शिफारशी एनसीईआरटीने आपल्या अहवालात केल्या आहेत.
‘एनसीईआरटी’च्या लिंग अभ्यास विभागाच्या प्रमुख ज्योत्स्ना तिवारी यांच्या नेतृत्वाखालील १६ सदस्यीय समितीने यासंबंधी मसुदा तयार केला आहे.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना विशिष्ट पोशाख आरामदायी वाटत नाही. त्यामुळे त्यांना सोईस्कर होईल, अशा गणवेशाचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शाळांतील सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा क्रीडा उपक्रमांत सहभाग घेताना हे गणवेश अडचणीचे ठरणार नाहीत याकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.त्याशिवाय क्रीडा आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये सहभाग वाढावा, गुंडगिरी आणि छळ यांविरोधात व्यक्त होणे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 03:04 IST

संबंधित बातम्या