मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल

शेतकरी आदोलनाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

संग्रहित छायाचित्र

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसेच राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत, सर्वनसिंग पंढेर, सतनामसिंग पन्नू यांच्या नावाचा समावेश आहे. गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान जे नेते सरकारसोबत चर्चा करत होते. त्या सर्वांवर कालच्या हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हेगारी षडयंत्र, लाल किल्ल्यावर दरोडा, घातक शस्त्रांचा वापर अशा प्रकारचे विविध १३ कलमांतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले असून दिल्लीत निघणाऱ्या ट्रॅक्टर परेडच्या आयोजनात आयोजक म्हणून या सर्वांची नावं होती. त्यामुळे आयोजकांना याला जबाबदार धरुन या सर्व लोकांची नाव एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली आहेत.

गुन्हे दाखल झालेले नेते

नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग, कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांच्या नावांचा एफआयआरमध्ये समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Medha patkar yogendra yadav rakesh tikait and 26 other farmer leaders have been booked aau

ताज्या बातम्या