श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्हा प्रशासनकडून रविवारी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि सात माजी आमदारांना २४ तासांच्या आत सरकारी निवासस्थाने सोडण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अन्यथा कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मेहबूबा मुफ्ती यांना गेल्या महिन्यातही श्रीनगरमधील गुपकार भागातील त्यांचे निवासस्थान सोडण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

रविवारी अनंतनागच्या उपायुक्तांच्या आदेशानुसार प्रथम श्रेणी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ही नोटीस मुफ्ती आणि इतरांना दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील खानाबल येथील वसाहतीत असलेल्या सरकारी सदनिकांसाठी दिली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेहबूबा मुफ्ती यांच्यासह माजी आमदार मोहम्मद अल्ताफ वनी, अब्दुल रहीम राथेर, अब्दुल मजीद भट, अल्ताफ शाह, अब्दुल कबीर पठाण, माजी आमदार बशीर शाह आणि चौधरी निजामुद्दीन यांना नोटिस बजावण्यात आली आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
High Court restrains demolition of loom department in Mafatlal
मफतलालमधील यंत्रमाग विभाग पाडण्यास उच्च न्यायालयाचा मज्जाव
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल