विरोधकांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या सरकारला विरोध ; मेहबूबा मुफ्ती यांची भूमिका

मेहबूबा यांनी ‘ट्विट’ केले, की नितीशकुमार यांच्या पक्षासह विरोधी पक्ष केवळ भाजपशी दोन हात करत आहेत

विरोधकांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या सरकारला विरोध ; मेहबूबा मुफ्ती यांची भूमिका

श्रीनगर : विविध सरकारी यंत्रणांचा शस्त्रासारखा गैरवापर करून देशातील विरोधी पक्षांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या, अनिर्बंध अधिकार गाजवणाऱ्या भाजप सरकारविरुद्ध लढा देत आहेत,’’ असे पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी सांगितले.

मेहबूबा यांनी ‘ट्विट’ केले, की नितीशकुमार यांच्या पक्षासह विरोधी पक्ष केवळ भाजपशी दोन हात करत आहेत, म्हणून त्यांना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे असे नाही. याशिवाय त्या शक्तिमान अशा अधिकार गाजवणाऱ्या सरकारच्या बळाविरुद्ध संघर्ष करत आहेत. हे सरकार विविध सरकारी यंत्रणांचा शस्त्रासारखा वापर करत आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्था (एनआयए), अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आदी संस्थांचा यात समावेश आहे. त्यांचा वापर स्वत:च्या सोयीसाठी विरोधीपक्ष मुक्त भारत निर्माण करण्यासाठी केला जात आहे. जम्मू-काश्मीरबाबत बोलायचे झाल्यास, हे नुकसान केवळ राजकीय पक्षांपुरते मर्यादित राहिलेले नाही. जम्मू-काश्मीरला राज्यघटनाबाह्य पद्धतीने दडपून अधिकारविहीन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आरएसएस’ ही उच्च जातींची संघटना – सिद्धरमय्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी