मी पळालो नाही, उपचारासाठी देशाबाहेर – मेहुल चोक्सी

मेहुल चोक्सीनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्रात सादर केलं आहे.

संग्रहित छायाचित्र

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले नीरव मोदीचा जोडीदार मेहुल चोक्सीनं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्रात सादर केलं आहे. मी देशसोडून पळालो नाही तर उपचारासाठी मला देशाबाहेर जावं लागलेय, असे प्रतिज्ञापत्रात चोक्सीनं म्हटले आहे. मेहूल चोक्सीनं न्यायालयात आजाराचे पुरावेही सादर केले आहेत.

सध्या अँटिग्वामध्ये राहत असून तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करत असल्याचे चोक्सीनं म्हटले आहे. जर न्यायालयाने परवाणगी दिल्यास दिल्यास तपास अधिकारी चौकशीसाठी येथे येऊ शकतात, असेही तो प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

माझ्या तबियतमध्ये सुधारणा झाल्यास लवकरच भारतात परतेल. तुर्तास विशेष न्यायालयासमोर आणि तपास अधिकाऱ्यांसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे खटल्याला उपस्थित राहण्याची माझी तयारी आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा प्रतिज्ञापत्रात चोक्सीनं केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे मी भारतातून पलायनं केले नाही, उपचारासाठी मला देश सोडावा लागला. सुनावणीवेळी मला न्यायालयात उपस्थित राहण्याची इच्छा आहे, पण आजारपणामुळे प्रवास करू शकत नसल्याचे प्रतिज्ञापत्रात चोक्सीनं म्हटलेय.

गेल्यावर्षी उघडकीस आलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यात १३००० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. यामध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे प्रमुख आरोपी आहेत. त्यांनी बँकेला फसवून कर्जे न फेडताच देशातून पळ काढला आहे. या घोटाळ्यामध्ये बँकेचेही काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mehul choksi said to bombay high court left country not to flee but for medical treatment nck

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या