मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स लग्नानंतर २७ वर्षांनी गेल्या वर्षॉ विभक्त झाले. सप्टेंबर २०२१ मध्ये बिल गेट्स आणि मेलिंडा फ्रेंच गेट्स यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला होता. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं होतं. त्याशिवाय दोघांनीही यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु आता पहिल्यांदाच मेलिंडा फ्रेंच यांनी त्यांच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केलंय.

सीबीएस जर्नलिस्टला दिलेल्या मुलाखतीत, मेलिंडा फ्रेंच गेट्स यांनी गुरुवारी यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीचे पती बिल गेट्स यांच्यावर जेफ्री एपस्टाईन याची अनेकदा भेट घेतल्यानं टीका केली. एपस्टाईनने २०१९मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्यावर बाल लैंगिक गुन्ह्यांचा आरोप असूनही बिल गेट्स त्याला अनेकदा भेटले होते, त्यांच्या या भेटीवरून मेलिंडा यांनी निशाणा साधला.

narendra modi uddhav thackeray (2)
मोदींनी उद्धव ठाकरेंना पुन्हा साद घातलेली? संजय राऊत म्हणाले, “दिल्लीतल्या त्या बैठकीत पंतप्रधानांनी…”
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, या जोडप्याने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर मेलिंडा यांनी त्यांच्या पहिल्या टेलिव्हिजन मुलाखतीत, कबूल केले की त्या एकदा एपस्टाईनला भेटल्या होत्या. “त्या भेटीनंतर मला वाईट स्वप्ने पडू लागली होती. हा माणूस कोण आहे हे मला पहायचे होते आणि मी त्याला भेटण्यासाठी त्याच्या दारात पाऊल ठेवल्यापासून मला पश्चात्ताप झाला होता,” असं मेलिंडा यांनी सांगितलं.

‘एपस्टाईनशी त्यांच्या पतीच्या संबंधाने घटस्फोटात भूमिका बजावली होती का?,’ असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, “होय. इतर सर्व कारणांपैकी हे देखील एक कारण होतं. ज्यामुळे हा घटस्फोट झाला. एपस्टाईनला घृणास्पद आणि अतिशय वाईट व्यक्ती म्हणत मेलिंडा यांनी बिल गेट्स यांना त्याला न भेटण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकलं नाही,” असा खुलासा देखील मेलिंडा यांनी केला.