scorecardresearch

धक्कादायक! मध्यरात्री व्यायाम करताना आईने हटकलं; संतापलेल्या मुलानं डंबेल्सने केली आईची हत्या

यावेळी आईला वाचवायला आलेल्या बहिणीवरही त्याने हल्ला केला आणि जखमी केलं.

murder
प्रातिनिधिक छायाचित्र

मध्यरात्री व्यायाम करताना आईने हटकल्याने संतापलेल्या मुलाने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी आईला वाचवायला आलेल्या बहिणीवरही त्याने हल्ला केला आणि जखमी केलं. ही घटना तेलंगणातील हैदराबादच्या सुल्तान बाझार परिसरात सोमवारी घडली. या घटनेतील हल्लेखोर मुलाचं नाव कोंडा सुधीर कुमार (वय २४) आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोंडा सुधीर कुमार हा मानसिक आजारी आहे. तो रात्रीच्या २ वाजता डंबेलने व्यायाम करत होता. यावेळी त्याची आई कोंडा पापम्मा हिने त्याला हटकलं. यामुळे संतापलेल्या सुधीरने डंबेलने मारहाण करत तिची हत्या केली. तो आईला मारत असताना त्याची बहीण तिला वाचवण्यासाठी आली. मात्र, सुधीरने तिच्यावरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेत आईचा मृत्यू झाला असून त्याची बहीण सुचित्रा बचावली आहे. सुचित्रा जखमी असून धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर आरोपी सुधीरला अटक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

सुधीर हा पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर फूड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता. मात्र वर्षभरापूर्वी त्याने नोकरी सोडली आणि तो घरीच राहत होता. तपासादरम्यान पोलिसांना कळले की सुधीर हा मानसिक आजारी होता आणि त्याच्यावर अलीकडेच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो आई आणि बहिणीसोबत राहत होता, असंही पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mentally ill son kills mom with dumbbell in hyderabad for asking him to stop exercising midnight hrc