केवळ दारूचा वास आला म्हणजे व्यक्ती नशेत आहे असे नाही – केरळ हायकोर्ट

”खासगी जागेवर दारू पिणे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत दारू पिणारे काही उपद्रव करत नाहीत.” असं देखील सांगितलं आहे.

(संग्रहीत प्रातिनिधिक छायाचित्र)

केरळ उच्च न्यायालयाने एका सुनावणीवेळी निर्णय दिला की, खासगी जागेवर दारू पिणे तोपर्यंत गुन्हा ठरत नाही, जोपर्यंत दारू पिणारे काही उपद्रव करत नाहीत. एका याचिकाकर्त्या विरोधात सुरू असलेली कार्यवाही रद्द करत जस्टिस सोफी थॉमस यांनी म्हटले की, कुणालाही त्रास न देता खासगी ठिकणा मद्यपान करणे गुन्हा ठरणार नाही. केवळ दारूच्या वासाचा अर्थ असा नाही काढला जाऊ शकत, की ती व्यक्ती नशेत होती किंवा दारूच्या प्रभावात होती.

याचिकाकर्त्यावर केरळ पोलीस अधिनियमाच्या कलम ११८(अ) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता. त्याला एका आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं होतं. जिथे तो कथितरित्या दारूच्या नशेत आढळला होता व त्यावर खटला दाखल करण्यात आला.

याचिकाकर्त्याकडून बोलणाऱ्या वकिलांनी युक्तीवाद केला की, याचिकाकर्ता ग्राम सहायक आहे आणि त्याला सायंकाळी ७ वाजता पोलीस स्टेशनला बोलावलं गेलं होतं. प्रकरण हे होतं की पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात केवळ यासाठी गुन्हा दाखल केला, कारण तो आरोपीची ओळख पटवण्यात अयशस्वी ठरला व आरोप केले की हा त्याच्याविरोधातील खोटा खटला होता. या आधारावर त्याने चार्जशीट रद्द करण्याची मागणी केली.

न्यायलयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला किंवा तो गैरवर्तन केले, असा कोणताही पुरावा नाही. एफआयआरमध्ये एकच आरोप होता की तो दारूच्या नशेत होता आणि त्याचे स्वतःवर नियंत्रण नव्हते.

न्यायमूर्तींनी पुढे असे सांगितले की केरळ पोलीस कायद्याच्या कलम ११८(अ) नुसार दंडनीय गुन्हा सिद्ध करण्यासाठी, एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दंगलग्रस्त स्थितीत मद्यधुंद किंवा स्वत: ची काळजी घेण्यास असमर्थ असल्याचे आढळले पाहिजे. या कायद्यांतर्गत ‘दारू’ या शब्दाची व्याख्या करण्यात आली नसल्याचेही निदर्शनास आले. या शब्दाचा अर्थ तपासण्यासाठी, न्यायालयाने अॅडव्हान्स लॉ लेक्सिकॉनवर विश्वास ठेवला. तसेच, न्यायालयाने ब्लॅकच्या लॉ डिक्शनरीचा देखील हवाला दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mere smell of alcohol does not mean that the person was intoxicated kerala high court msr

ताज्या बातम्या