चिमुकल्या मुलींवर अनैसर्गिक अत्याचार करुन शिक्षिकेने प्रियकराला पाठवला व्हिडिओ

या प्रकरणात शिक्षिका आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली

मध्यप्रदेशमधील महू शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. खासगी शिकवणी घेणाऱ्या एका महिला शिक्षिकेने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचार केले आहेत. इतकंच नव्हे तर त्या शिक्षिकेने या मुलींवर केलेल्या लैंगिक छळाचा व्हिडिओ आपल्या प्रियकरालाही पाठवला आहे. आरोपी शिक्षिका आणि तिच्या प्रियकराविरोधात पॉक्सो आणि अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची असून तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

इंदौरजवळील महू येथे ही घटना घडली आहे. येथे खासगी शिकवणी घेणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीने तिच्याकडे शिकायला येणाऱ्या एका लहान मुलीवर अनैर्गिक अत्याचार केले. या तरुणीकडे दोन बहिणी शिकण्यासाठी यायच्या. या दोन्ही मुलींवर तरुणीने अत्याचार केला. मिळालेल्या माहितीनुसार सहा वर्षाच्या बहिणीबरोबर गेलेल्या लहान मुलीच्या गुप्तांगामध्ये या तरुणीने पेन्सील घुसवली. या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन तिने आपल्या प्रियकराला पाठवला.

पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी आल्यानंतर काही तासांनी या मुलीने गुप्तांगाजवळ दुखत असल्याची तक्रार आपल्या आईकडे केली. तिच्या आईने तिची तपासणी केली असता मुलीच्या गुप्तांगावर जखमा अढळून आल्या. याप्रकरणी आईने चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मोठ्या मुलीकडे चौकशी केली असता तिने बहिणीने सांगितलेली घटना खरी असल्याची कबुली दिली.

या प्रकरणामुळे मुलींच्या आईला धक्का बसला. घरापासून काही अंतरावर असणाऱ्या या तरुणीच्या घरी जाऊन या महिलेने तिला मारहाण करत जाब विचारत घराबाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांकडे या तरुणूीने गुन्हा कबुल केला आहे. या तरुणीच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ अढळून आला असून तिचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात महू पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mhow horror woman tutor sexually abuses 2 kids sends video to boyfriend scsg

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या