मायक्रोसॉफ्टने फेब्रुवारी महिन्यात काम नीट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नारळ देत घरचा रस्ता दाखवला होता. आता याच कंपनीत कर्मचाऱ्यांची दुसऱ्यांचा छाटणी सुरु झाली आहे. सत्य नडेला यांनी त्यावेळीही सांगितलं होतं की तुम्ही जर चांगलं काम करत असाल तरच कामावर राहू शकता अन्यथा तुम्हाला कमी केलं जाईल. आता दुसऱ्यांदा मायक्रोसॉफ्टने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मायक्रोसॉफ्टने काय निर्णय घेतला आहे?
मायक्रोसॉफ्टने त्यांच्या कंपनीच जागतिक स्तरावर ३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका सुमारे सहा हजार कर्मचाऱ्यांना बसणार आहे. कारण सहा हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाणार आहे असं मायक्रोसॉफ्टने जाहीर केलं आहे. आम्ही जागतिक स्तरावर हे बदल करत आहोत असं कंपनीने म्हटलं आहे. २०२३ मध्ये कंपनीने जागतिक स्तरावर १० हजार जणांना कामावरुन कमी केलं होतं. ज्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्यांना आम्ही कामावरुन कमी करणारच कंपनीचं हे धोरण आहे. त्या धोरणानुसारच आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
मायक्रोसॉफ्टने देणार साठ दिवसांचं वेतन आणि बोनस
मायक्रोसॉफ्ट ज्या कर्मचाऱ्यांना काढणार आहे त्यांना साठ दिवसांचं वेतन आणि बोनस देणार आहे. कंपनीने नुकताच धोरणात्मक बदल केला आहे त्यानुसार परफॉर्म न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येतं आहे. २०२३ मध्ये मायक्रोसॉफ्टने १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. त्यानंतरची ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.
AI मध्ये गुंतवणूक केल्याने कर्मचारी कपात
जून २०२४ पर्यंत मायक्रोसॉफ्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख २८ हजार इतकी होती. त्यातले १९८५ कर्मचारी हे वॉशिंग्टनचे आहेत. आता नव्या धोरणात्मक निर्णयानुसार तीन टक्के कर्मचारी कपात कंपनीला करायची आहे. त्यामुळे यावर्षी सहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येतं आहे. कंपनीने AI मध्ये मोठी गुंतवणूक केल्याने हा निर्णय घेतल्याचंही सांगितलं आहे.