बारामुल्लामध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार, तीन जवान जखमी

बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर तीन जवान जखमी झाल्याचे समजते.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील तांगमार्ग भागातील कुंझेर येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. कुंझेर परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांकडून शोध येथे शोध मोहिम राबविण्यात आली. यात दहशतवाद्याने गोळीबार केल्याने तीन जवान जखमी झाले. त्यानंतर प्रत्युत्तरात जवानांकडून झालेल्या गोळीबारात दहशतवाद्याला ठार करण्यात आले. त्याच्याकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Militant killed three soldiers injured in gunbattle