India… He की Her : राहुल गांधींच्या ‘ट्वीट’वरून वाद; इंग्रजी शब्दांवरून झाले ट्रोल

फ्लाईंग शिख मिल्खा सिंग यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली… ट्वीटमधील एका शब्दप्रयोगावर आक्षेप घेत अनेकांनी राहुल गांधींना ट्रोल केलं…

milkha singh news, Rahul gandhi tribute milkha singh, Rahul gandhi tweet
फ्लाईंग शिख मिल्खा सिंग यांच्या निधनाचं वृत्त कळाल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना ट्विट करून श्रद्धांजली वाहिली… ट्वीटमधील एका शब्दप्रयोगावर आक्षेप घेत अनेकांनी राहुल गांधींना ट्रोल केलं…

महान धावपटू मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी मध्यरात्री निधन झालं. उपचार सुरू असतानाच मिल्खा सिंग यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देश हळहळला. सोशल मीडियासह वेगवेगळ्या माध्यमांतून त्यांना श्रद्धांजली अपर्ण केली जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, राहुल गांधी श्रद्धांजलीपर केलेलं हे ट्वीट वेगळ्याचं कारणाने चर्चेचा विषय ठरले. राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये वापरलेल्या एका इंग्रजी शब्दावर आक्षेप घेत अनेकांनी त्यांची थट्टा केली.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर ट्वीट करत राहुल गांधी म्हणाले,”मिल्खा सिंगजी फक्त प्रसिद्ध क्रीडापटूचं नव्हते. लवचिकता आणि समपर्ण यासाठी ते लाखो भारतीयांचे प्रेरणास्त्रोत होते. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्र परिवारांच्या दुखात मी सहभागी आहे. भारत नेहमीच आपल्या फ्लाईंग शिखचं स्मरण करत राहिल,” असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधींच्या या ट्विटमधील शेवटचं वाक्य India remembers her #FlyingSikh असं आहे. या वाक्यात Her हा शब्द वापरलेला असून, त्यावरून अनेकांनी राहुल गांधी यांच्या इंग्रजीबद्दलच्या ज्ञानाची थट्टा उडवली आहे. India हा शब्द पुल्लिंगी असून, he ऐवजी her वापरलं असल्याचं सांगत राहुल गांधी भारत शब्दाचं जेंडर बदलल्यांचं अनेकांनी म्हटलं आहे.

देशाचं लिंग निश्चित केलं जाऊ शकतं का? India… he बरोबर की her ?

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटनंतर भारताचं जेंडर काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पण, देशाचं लिंग निश्चित करता येत नाही. हे देशातील सामाजिक मान्यतेवरच ठरतं. देशाचा इंग्रजीत उल्लेख करायचा झाल्यास मदरलँड (motherland) असा केला जातो. पण जर्मनीत फादरलँड असा उल्लेख केला जातो. भारत वा इंडिया या शब्दांचं असं कोणतंही जेंडर निश्चित नाही. भारताविषयी बोलताना अनेकवेळा भारतमाता या आशयानेच उल्लेख केला जातो. याबद्दल दिल्ली विद्यापाठाशी संलग्नित असलेल्या मैत्रैयी महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. सविता पाठक यांनी आजतक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, “जगातील इतर देशांपेक्षा भारतात वेगळ्या गोष्टींना समाजमान्यता आहे. दुसऱ्या राष्ट्रात देशाचं नाव घेताना फादरलँड अशा आशयानं घेतलं जातं, तर भारतात मदरलँड (मातृभूमी) या आशयाने म्हटलं जातं. त्यामुळे इंडिया असा उल्लेख करायचा झाल्यास मदर इंडिया होतं आणि त्यामुळे Her शब्दप्रयोगच योग्य ठरतो.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Milkha singh news rahul gandhi tribute milkha singh rahul gandhi tweet india he or her bmh