खाणी आणि खनिज पदार्थ विधेयकाला शुक्रवारी राज्यसभेचीही मंजुरी मिळाली. सरकारकडून मांडण्यात आलेले हे विधेयक राज्यसभेमध्ये ११७ विरुद्ध ६९ मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर केंद्र सरकारने यासंदर्भात काढलेल्या वटहुकूमाचे रुपांतर कायद्यात होईल.
राज्यसभेमध्ये या विधेयकावर चर्चेनंतर कॉंग्रेससह इतर विरोधकांनी हे विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठविण्याची मागणी केली. मात्र, सरकारने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे या विधेयकावर मतदान घेण्यात आले. यामध्ये विधेयकाच्या बाजूने ११७ सदस्यांनी तर विरोधात ६९ सदस्यांनी मतदान केले. हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाल्यामुळे तिथे बहुमत नसलेल्या केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2015 रोजी प्रकाशित
खाणी आणि खनिज पदार्थ विधेयक राज्यसभेतही मंजूर
खाणी आणि खनिज पदार्थ विधेयकाला शुक्रवारी राज्यसभेचीही मंजुरी मिळाली.
First published on: 20-03-2015 at 04:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mines minerals bill gets rajya sabha nod