रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं करोनानं निधन

दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचं एम्समध्ये करोनामुळं निधन झालं.

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच आज (बुधवार) दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते करोना पॉझिटिव्ह होते, अशी माहिती एम्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अंगडी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे.

सुरेश अंगडी यांना या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. ११ सप्टेंबर रोजी त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

अंगडी यांच्या निधनानंतर भावना व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सुरेश अंगडी हे पक्षाचे एक असे कार्यकर्ते होते, ज्यांनी कर्नाटकमध्ये भाजपाला मजबूत करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. ते एक समर्पित खासदार आणि प्रभावशाली मंत्री होते. त्याचं निधन झालं ही दुःखद घटना आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Minister of state for railways suresh angadi passes away in aiims delhi he was tested positive for covid19 aau

ताज्या बातम्या