scorecardresearch

आधी समाजमाध्यमांवर ओळख, नंतर मैत्री; तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेच्या आईलाही केले फोटो शेअर

समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या एका मित्राकडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

MINOR GIRL RAPE
सांकेतिक फोटो

समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या एका मित्राकडून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याची घटना हरियाणामधील गुरुग्राम येथे घडली आहे. गुरुवारी (२ फेब्रुवारी) ही घटना घडली असून आरोपीने अल्पवयीन मुलीचे नग्न तसेच संवेदनशील फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित केले. तसेच हे फोटो मुलीच्या आईलादेखील पाठवले. फोटो सार्वजनिक झाल्यानंतर बलात्काराचा ही घटना समोर आली आहे. राज द्विवेदी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे.

हेही वाचा >>> ‘चिटफंड’ प्रकरण : चिदंबरम यांच्या पत्नीसह तिघांची मालमत्ता ‘ईडी’कडून जप्त

मुलीची समाजमाध्यमांवर एका तरुणाशी ओळख

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुग्राम येथील इयत्ता ११ वी मध्ये शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची समाजमाध्यमांवर एका तरुणाशी ओळख झाली. ही ओळख नंतर मैत्रीत बदलली. पुढे या तरुणाने मुलीला हॉटेलवर नेत अत्याचार केला. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो काढून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले. हेच फोटो तरुणाने मुलीच्या आईच्या मोबाईलवरदेखील पाठवले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

हेही वाचा >>> बीबीसी वृत्तपट बंदीची मूळ कागदपत्रे सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

फोटो तसेच चॅटिंग समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी

पीडित मुलीची सोशल मीडियावर मागील वर्षी राज द्विवेदी याच्याशी ओळख झाली होती. पुढे या दोघांमध्ये मैत्री झाली. दोघांनीही एकमेकांना संवेदनशील फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. त्यानंतर या दोघांची गुरुग्राम येथे एका हॉटेलमध्ये भेट झाली. तेथे आरोपीने मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीकडून संवेदनशील फोटो तसेच चॅटिंग समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली जाऊ लागली. पुढे आरोपीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तसेच पीडित मुलीच्या आईलादेखील हे फोटो पाठवले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

हेही वाचा >>>ट्रान्स मॅन झाला प्रेग्नंट, केरळच्या त्या कुटुंबात हलणार पाळणा, तृतीयपंथीयांची प्रेमकहाणी व्हायरल

मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आयटी अॅक्ट तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 08:08 IST