पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच काँग्रेसमध्ये विरोधाचे सूर उमटताना दिसत आहेत. २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. अशा स्थितीत राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवल्याने नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी आणि काँग्रेस नेत्या नवज्योत कौर यांची नाराजी समोर आली आहे.

खरे तर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. मात्र राहुल गांधींनी चन्नी यांच्या नावाची घोषणा केली. अशा स्थितीत सिद्धू यांची नाराजी समोर आली नाही. परंतु, एवढ्या मोठ्या पदावर बसण्यासाठी गुणवत्ता, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि त्यांचे काम बघायला हवे, असे त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले आहे.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

सिद्धू हे माझे पती असू आहेत आणि मुख्यमंत्रिपदासाठी तेच योग्य पर्याय आहे, असे सांगण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, नाव जाहीर करण्याबाबत राहुल गांधींची दिशाभूल झाली का? यावर नवज्योत कौर म्हणाल्या की हो, अगदी. मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा करताना राहुल गांधींची दिशाभूल झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित झाल्यानंतर, सिद्धू यांनी व्हर्च्युअल रॅलीमध्ये आपल्या आईची शपथ घेत म्हटलं की, ते पंजाब काँग्रेसमधून कुटुंबवाद संपवतील. ते म्हणाले की, “आता खूप झालंय, आता एकाही आमदाराच्या मुलाला सभापतीपद मिळणार नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना अध्यक्षपद मिळेल. जर पंजाबमध्ये कुटुंबवाद झाला तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन,” असं त्यांनी म्हटलं.

नवज्योत कौर या मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित करत असतील, तरीही राहुल गांधींनी सिद्धूसमोर चन्नी यांची स्तुती करत तेच ही आपली निवड असल्याचे स्पष्ट केले आहे.