महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही आठवड्यांपूर्वीच त्यांचा पक्ष लोकसभा निवडणुक लढणार नसल्याचे जाहीर केले. मात्र आपण पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरुद्ध प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. १२ एप्रिल रोजी नांदेडमध्ये, १५ एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली. पहिल्याच सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींची काही वर्षांपूर्वीची आणि आत्ताच्या विधानांचे व्हिडिओ दाखवून त्यांनी दिलेली आश्वासने किती फसवी आहेत यासंदर्भात भाषण केले. पुराव्यांसकट राज यांनी केलेले हे ‘स्मार्ट’ भाषण नेटकऱ्यांच्या चांगल्याच पसंतीस पडले. त्यानंतरच्या दोन्ही सभांमध्येही त्यांनी व्हिडिओचा वापर करुन सरकारवर घणाघाती टिकास्त्र सोडले. याच व्हिडिओचा धसका आता विरोधकांनी घेतल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच ‘लाव रे तो व्हिडिओ’बद्दल सोशल नेटवर्किंगवर अनेक पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी राज यांच्या प्रचाराची ही स्टाइल आवडल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या व्हिडिओचा आता विरोधकांनी धसका घेतल्याचे मत मांड़ले आहे. ट्विटर तसेच फेसबुकवर ‘लाव रे तो व्हिडिओ’ नावाने अनेक पोस्ट करण्यात आल्या असून हे चार शब्द सध्या नेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. पाहुयात असेच काही ‘लाव रे तो व्हिडिओ’वाले ट्विटस…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढा प्रतिसाद मैं भी चौकीदारलाही नाही

असचं चालू राहिलं तर

जाऊदे ना व…

फिलिंग वंडरफूल म्हणे…

एकमेव वाक्य

समर्थकांच्या अंगावर काटा येतो

राजकारणातील सर्वात खतरनाक वाक्य

चौकीदार चोर है या अफाट यशानंतर

चूक झाली

सगळं आठवतं

सहनही होईना आणि सांगताही येईना

एपिक स्टाइल

त्यांना इग्नोर करु शकत नाही

लाव रे व्हीडीओ म्हटल्यावर…

तो व्हिडीओ पण लावा

भक्तांना भिती

थप्पड से डर नही लगता साहब…

ट्रोल

आता सरकार एलईडी बंदी आणणार

जोमात अन् कोमात

दरम्यान राज यांच्या दौऱ्यामधील तीन सभा झाल्या असून आणखीन तीन ठिकाणी ते सभा घेणार आहेत. यापैकी सातारा येथे आज (१७ एप्रिल), पुण्यात १८ एप्रिल रोजी शिंदे मैदानात राज यांची सभा होणार आहे. दौऱ्यातील शेवटची सभा शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रायगडमधील बांदे मैदानात होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray lav re to video went viral with memes
First published on: 17-04-2019 at 10:58 IST