“मोदी इम्रान यांचा फोन उचलत नाहीत तर बायडेन…”; विरोधी पक्षाच्या महिला नेत्याचा पाकिस्तान सरकारवर हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद यूसुफ यांनी हस्यास्पद वक्तव्य करताना थेट अमेरिकेला धमकी दिली.

Modi Imran Khan
एका जाहीर सभेतील भाषणामध्ये साधला निशाणा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सध्या काम करणाऱ्या सरकारवर विरोधी पक्षांनी हल्लाबोल करण्यास सुरुवात केलीय. पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्षाची जाहीर सभांमधून पोलखोल करताना विरोधी पक्षाचे नेते इम्रान खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधत आहे. पाकिस्तानमधील मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या पीएमएल-एनच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ यांनी आत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत पाकिस्तानी पंतप्रधानांवर निशाणा साधलाय.

आयएसआय प्रमुखांची मुलाखत घेतल्याचं प्रकरण सध्या पाकिस्तानच्या राजकारणात चांगलं तापलं आहे. त्यावरुन मरियम यांनी इम्रान यांच्यावर टीका केलीय. “परराष्ट्र धोरणांमध्ये इम्रान खान अपयशी ठरलेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इम्रान यांचा फोन उचलत नाही तर अमेरिकन राष्ट्रायक्ष जो बायडेन हे त्यांना फोन करत नाहीयत,” असं म्हणत मरियम यांनी इम्रान यांच्यावर जाहीर भाषणामधून टीका केल्याचं वृत्त द डॉन या वृत्तपत्राने दिलंय.

इम्रान खान सरकार पाडा…
फैसलाबादमधील धोबीघाट मैदानामधील जाहीर सभेत दिलेल्या भाषणामध्ये इम्रान खान यांनी केवळ एक आश्वासन पूर्ण केल्याचं मरियम म्हणाल्या. प्रत्येक व्यक्तीला रडवण्याचं आश्वासन त्यांनी पूर्ण करुन दाखवलं. आज संपूर्ण देश रडत आहे, असा टोला मरियम यांनी लगावला. “अमेरिकन वृत्तवाहिन्यांवरील लोकांच्या वक्तव्यानुसार इम्रान खान यांची खरी सत्ता इस्लामाबादमधील महापौरापेक्षा अधिक नाहीय,” असंही मरियम म्हणाल्या. तसेच इम्रान खान सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन मरियम यांनी जनतेला केलं.

सत्तेत आल्यापासून मोदींशी बोलण्याचा प्रयत्न…
इम्रान खान सत्तेत आल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करावी यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळामध्ये मागील काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही इम्रान खान आणि मोदी यांच्यात प्रत्यक्षात संवाद झालेला नाही.

बायडेन यांनी अनेकांना फोन केला पण इम्रान यांना नाही..
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यापासून अजून इम्रान यांच्याशी थेट चर्चा केलेली नाही. सत्तेत आल्यानंतर बायडेन यांनी लहान मोठ्या अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केलीय. या संदर्भात इम्रान यांनीही अनेकदा थेटपणे नाराजी व्यक्त केलीय. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच याबद्दल बोलताना, बायडेन हे फार व्यस्त असतात त्यामुळे त्यांनी अजून एकही कॉल केला नसेल, असं म्हटलं होतं.

अमेरिकेला इशारा…
एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोइद यूसुफ यांनी हस्यास्पद वक्तव्य करताना थेट अमेरिकेला धमकी दिली. बायडेन आमच्याकडे दूर्लक्ष करत असतील तर आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध असल्याचं यूसुफ म्हणाले होते. चीनसोबत आम्ही जाऊ असं यूसुफ यांना सूचित करायचं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi does not receive imran khan call and biden does not call him says pml n vp maryam nawaz at faisalabad rally scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या