Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा पाच वर्षातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी भरीव तरतूद केली जाईल, असे सांगितले. याआर्थिक वर्षात सरकारकडून कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

यंदाच्या अर्थसंकल्पासाठी शेती क्षेत्रासाठी काय तरतूद?

>>>> शेती क्षेत्रासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारण्यात येईल. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेतकरी तसेच शेताकेंद्रीत सुविधा देण्यात येतील. सिंचन, आरोग्य, बाजाराविषयी माहिती, विमा, शेतीविषयक उद्योगांची वाढ तसेच स्टार्टअप्ससाठी या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Budget 2023 App: केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिकृत सरकारी अ‍ॅप कसं डाऊनलोड करायचं? वाचा सोप्या टिप्स…

>>>> ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना तसेच स्टार्टअप्सना विशेष प्रोत्साहन दिले जाईल. त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल. या तरतुदीच्या माध्यमातून शेतऱ्यांना येणाऱ्या अडचणींसाठी किफायतशीर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. नवे तंत्रज्ञान, उत्पादनात वाढ, फायदा यासाठीही प्रयत्न केला जाईल.

>>>> कापसाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी शेतकरी, सरकार, उद्योजक यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाईल.

>>>> फोलत्पादनात वाढ होण्यासाठी आत्मनिर्भर क्लीन प्लांट मोहीम राबवली जाईल.

हेही वाचा – Union Budget 2023: अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये तेजी; सेसेंक्समध्ये ५००, तर निफ्टीतही १४७ अकांची वाढ

>>>> नैसर्गिक शेती करण्यासाठी आगामी तीन वर्षांत जवळपास १ कोटी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरुपात मदत केली जाईल. त्यासाठी १००० बायो इनपूट रिसर्च सेंटरची स्थापना केली जाईल.

>>>> सरकारकडून पशुपालन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसायाची वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाची २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात येईल.

>>>> मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून पंतप्रधान मत्स्य संपादा योजनेव्यतिरिक्त एक उपयोजना सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader