केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना केंद्र सरकारने पुढील महिन्यात इटलीला भेट देण्यास परवानगी नाकारली आहे. ममता बॅनर्जी ऑक्टोबरमध्ये व्हॅटिकनमध्ये होणाऱ्या जागतिक शांतता परिषदेत सहभागी होणार होत्या, पण केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यावर ममतांनी पलटवार करत पंतप्रधान मोदी माझा हेवा करतात असे त्यांनी म्हटले आहे.

Mallikarjun Kharge criticizes PM Narendra Modi on Ram Mandir Pranpratistha Ceremony
“मी अयोध्येत गेलो तर त्यांना सहन झाले असते का?” काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांचा सवाल
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

पंतप्रधान मोदी आणि केंद्रावर संतापून ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली आहे. “जागतिक शांततेसंदर्भात रोममध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मलाही तिथे आमंत्रित केले होते. इटलीने मला विशेषतः बोलावले होते, तरीही केंद्राने मुख्यमंत्र्यांसाठी हे योग्य नाही असे म्हणत मंजुरी नाकारली, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

मी सुद्धा एक हिंदू महिला – ममता बॅनर्जी

“तुम्ही मला रोखू शकणार नाही, मी परदेशात जाण्यास उत्सुक नाही, पण हे देशाच्या सन्मानाशी संबंधित आहे. तुम्ही (पंतप्रधान मोदी) हिंदूबद्दल बोलता, मी सुद्धा एक हिंदू महिला आहे. तुम्ही मला परवानगी का देत नाही? तुम्ही पूर्णपणे माझा मत्सर करत आहात,” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

“आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. तालिबानी भाजपा भारत चालवू शकत नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी फक्त तृणमूल पुरेसे आहे. खेला होबे भबानीपूरपासून सुरू होईल आणि संपूर्ण देश जिंकल्यानंतर संपेल,” असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे.  

मोदीजी तुम्हाला बंगालपासून काय त्रास आहे?

या निर्णयावरून तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते देवांगशु भट्टाचार्य देव यांनी ट्विट केले आहे. केंद्र सरकारने ममतांच्या रोम दौऱ्याला परवानगी दिली नाही. यापूर्वी त्यांनी चीनला जाण्याची परवानगीही रद्द केली आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि भारताचे हित लक्षात घेऊन आम्ही तो निर्णय स्वीकारला. आता इटली का मोदीजी? बंगालपासून काय त्रास आहे?”, असे देवांगशु भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.

ऑगस्टमध्ये बॅनर्जी यांना रोम स्थित कॅथोलिक असोसिएशन ऑफ द कम्युनिटी ऑफ सेंट’एगिडीओचे अध्यक्ष मॅक्रो इम्पाग्लियाझो यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते. ममता या एकमेव भारतीय आहे ज्यांना या कार्यक्रमाला बोलावण्यात आले आहे. पोप फ्रान्सिस, जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि इजिप्तच्या अल-अल्झहरचे ज्येष्ठ इमाम एचई अहमद अल-तैयब, इतर महत्त्वाच्या व्यक्ती ६ आणि ७ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सहभागासाठी हा कार्यक्रम परिस्थितीला अनुकूल नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्रात नमूद केले आहे असे एका तृणमूल नेत्याने म्हटले आहे.