मोदी सरकारची दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत घेतला मोठा निर्णय

दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याची मोठी घोषणा केली आहे.

petrol-diesel-price_1598402034
दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना मोदी सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपयांची कपात केली आहे. उद्या (गरुवार) सकाळपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

भारतातील बहुतेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले आहे आणि जवळपास दररोज ३५ पैशांनी महाग होत आहे. ४ ऑक्टोबर २०२१ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत पेट्रोलच्या दरात सरासरी ८ रुपयांनी वाढ झाली आहे.

केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क आकारते. जे संपूर्ण भारतात एकसमान आहे. मात्र यावर आकारले जाणारे व्हॅटचे दर राज्यानुसार भिन्न आहेत. राजस्थानमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर देशात सर्वाधिक व्हॅट आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोल आणि डिझेल सर्वात महाग आहे. त्यामुळे केंद्राने राज्यांना देखील व्हॅट कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.

उत्पादन शुल्कातील कपातीबाबत अर्थ मंत्रालयाने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलने १०० रुपयांचा पल्ला गाठला आहे. काही शहरात तर पेट्रोलने ११० रुपयांची पातळी ओलांडली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईही वाढली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi government diwali gift big decision taken regarding price of petrol and diesel srk

ताज्या बातम्या